US Open 2025 : यूएस ओपन जिंकताच कार्लोस अल्काराझवर कोट्यवधींचा पाऊस, उपविजेता सिनरही झाला मालामाल

Carlos Alcaraz Wins US Open 2025 : स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझने यूएस ओपन 2025 च्या अंतिम सामन्यात इटलीच्या यानिक सिनरला 6-2, 3-6, 6-1, 6-4 ने पराभूत करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयासह अल्काराझने आपल्या कारकिर्दीतील सहावा ग्रँड स्लॅम किताब जिंकला आणि रेकॉर्डब्रेक प्राइज मनीही आपल्या नावावर केली.
रेकॉर्डब्रेक प्राइज मनी –
यंदाच्या वर्षात अल्काराझने फ्रेंच ओपन 2025 नंतर यूएस ओपन जिंकत दोन ग्रँड स्लॅमवर आपले नाव कोरले. दुसरीकडे, यानिक सिनरनेही यंदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन जिंकत दोन ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. यूएस ओपन 2025 च्या विजेत्या अल्काराझला युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनकडून (USTA) तब्बल 5 मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे 42 कोटी रुपये) ची प्राइज मनी मिळाली.
How Carlitos’ second US Open title sounded on US Open radio 🔊 pic.twitter.com/mL0KkTfzyc
— US Open Tennis (@usopen) September 7, 2025
उपविजेता ठरलेल्या यानिक सिनरला 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे 22 कोटी रुपये) ची प्राइज मनी मिळाली. यंदा यूएस ओपनने एकूण 90 मिलियन डॉलर (सुमारे 750 कोटी रुपये) ची प्राइज मनी जाहीर केली होती, जी गेल्या वर्षीच्या 75 मिलियन डॉलरच्या तुलनेत 20% जास्त आहे. यामुळे यूएस ओपन 2025 हे इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनी देणारे ग्रँड स्लॅम ठरले आहे. पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांना प्रत्येकी 5 मिलियन डॉलर देण्यात आले, जी गेल्या वर्षीच्या 3.6 मिलियन डॉलरच्या तुलनेत 39% जास्त आहे.
खेळाडूंच्या मागणीमुळे प्राइज मनीत वाढ –
PURE DOMINANCE 🔥🎾
In the last eight Grand Slams, only Jannik Sinner and Carlos Alcaraz have lifted the trophy, with four titles each. A rivalry that is redefining an era 👑⚡#USOpen #JannikSinner #CarlosAlcaraz #USOpen2025 pic.twitter.com/b3t2bzB72R
— Sportskeeda Tennis (@SK__Tennis) September 8, 2025
प्राइज मनीतील ही वाढ जगातील अव्वल टेनिसपटूंच्या मागणीनंतर करण्यात आली. अलीकडेच अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या चारही ग्रँड स्लॅमच्या आयोजकांना पत्र लिहून प्राइज मनीत वाढ करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा – BCCI Financial Growth : बीसीसीआयच्या कमाईत प्रचंड वाढ; अवघ्या पाच वर्षांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा
यूएस ओपन 2025 प्राइज मनी (पुरुष एकेरी, प्रति खेळाडू) –
- विजेता : 5,000,000 अमेरिकी डॉलर
- उपविजेता : 2,500,000 अमेरिकी डॉलर
- उपांत्य फेरी : 1,260,000 अमेरिकी डॉलर
- उपउपांत्य फेरी : 660,000 अमेरिकी डॉलर
- राउंड ऑफ 16 : 400,000 अमेरिकी डॉलर
- राउंड ऑफ 32: 237,000 अमेरिकी डॉलर
- राउंड ऑफ 64: 154,000 अमेरिकी डॉलर
- राउंड ऑफ 128: 110,000 अमेरिकी डॉलर
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : भारताने आशिया कप जिंकत रचला इतिहास! पाकिस्तानला मागे टाकत विश्वचषकासाठी ठरला पात्र
यूएस ओपन 2025 ने प्राइज मनीच्या बाबतीत नवीन मानदंड स्थापित केले असून, अल्काराझच्या या विजयाने त्याला केवळ किताबच नाही तर आर्थिकदृष्ट्याही मोठा लाभ मिळवून दिला आहे.





