ताम्हीणी घाटात कार दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी
Updated On:

रायगड – ताम्हीणी घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुरलीधर पंडीत (वय 73) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यस्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड पुणे येथून सात जण रायगडला जात होते. यावेळी कार ताम्हीणी घाटात आली असता कोंडेघर गावाजवळील घाट रस्त्यावरील वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट 30 फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेत मुरलीधर यांचा मृत्यू झाला तर चालक राहूल पंडीत, गौरी पंडीत, प्रणाली पंडीत, मानसी पंडीत, अर्जुन पंडीत, मंजुश्री पंडीत हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक आणि प्रवाशांच्या मदतीने मयत आणि जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात चालक राहुल पंडीत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





