तीन जणांना बनावट चकमकीत मारल्याप्रकरणी कॅप्टनला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली – बनावट चकमक प्रकरणात एका लष्करी अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका लष्करी न्यायालयाने दक्षिण काश्मीरमधील आमशीपुरा येथे जुलै 2020मध्ये बनावट चकमकीत तीन जणांना ठार केल्याप्रकरणी एका कॅप्टनला ही जन्मठेपेच्या शिक्षेची शिफारस केली आहे.
सैन्याने सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्यांतर्गत दिलेले अधिकार ओलांडले असल्याचे या सुनावणीत स्पष्ट झाले आहे, असे लष्करी न्यायालयाने म्हटले आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरी आणि पुराव्याच्या आधारे कॅप्टन भूपेंद्र सिंग यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्यात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.
जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातील इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इब्रार यांची 18 जुलै 2020 रोजी शोपियान जिल्ह्यातील एका दुर्गम डोंगराळ गावात चकमकीत हत्या करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी ठरवून लष्करी अधिकाऱ्यांनी बनावट चकमक दाखवून त्यांना ठार मारल्याचा आरोप होता. या आरोपानंतर लष्कराने तातडीने त्यांचे कोर्टमार्शल केले.




