IPL 2024 : एम.एस. धोनी सोडणार CSK चे कर्णधारपद? कॅप्टन कूल’ नव्या भूमिकेसाठी सज्ज, FB पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ…

Indian Premier League #MSDhoni #CSK : 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. 17व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचे चाहते त्याला पुन्हा एकदा मैदानावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. पण सोशल मीडियावर कमी सक्रिय असलेल्या धोनीच्या एका पोस्टने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
यावेळी आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीची भूमिका बदलणार का? कारण काही वेळापूर्वीच धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
धोनीने फेसबुकवर केली आहे पोस्ट…
महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असतो. तो काही गोष्टी पोस्ट करतो त्या जास्त करून व्यावसायिक गोष्टी असतात. दरम्यान, सोमवारी एमएस धोनीने फेसबुकवर एक पोस्ट केली, “ज्यामध्ये Can’t wait for the new season and the new ‘role’. Stay tuned! असे लिहिले आहे. म्हणजे नवीन सीझन आणि नवीन ‘भूमिका’ साठी वाट पाहू शकत नाही. संपर्कात राहा! आता सीएसकेमध्ये एमएस धोनी नव्या भूमिकेत दिसणार की आणखी काही वेगळं असेल, हा प्रश्न आहे.
धोनीची पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. धोनी खेळाडू म्हणून मैदानात उतरणार नसला तरी मास्टर प्लॅनर असेल असे कुणाला वाटते. त्याचवेळी धोनी वरच्या फळीत फलंदाजीला येण्याची शक्यताही अनेकांनी व्यक्त केली. CSKचा सलामीवीर डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळणार नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-gujarat-titans-rs-3-60-crore-buy-robin-minz-injured-in-a-superbike-accident/
रवींद्र जडेजा 2022 साली होता संघाचा कर्णधार…
असो, गेल्या दोन-तीन वर्षांपासून महेंद्रसिंग धोनीनंतर सीएसकेचा नवा कर्णधार कोण असेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 2022 IPL सुरू होण्याच्या काही दिवस आधी धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजाला नवीन कर्णधार बनवण्यात आले. पण जडेजा त्याच्या नेतृत्वाखाली काही विशेष करू शकला नाही. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाने एकूण 8 सामने खेळले आणि त्यापैकी फक्त 2 सामने जिंकता आले. उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर जडेजाने मध्यंतरी कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि CSK संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकला नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/vadodara-police-seize-rs-1-crore-from-former-womens-cricket-coach-tushar-arothe/
यावेळीही धोनीबाबत लावले गेले विविध अंदाज…
2022 च्या खराब कामगिरीनंतर, धोनी संपूर्ण 2023 हंगामासाठी CSK चा कर्णधार राहिला आणि संघाने पाचव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. दरम्यान, धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, अशी अटकळ पुन्हा एकदा वर्तवली जात आहे, मात्र खुद्द धोनीने याबाबत काहीही सांगितलेले नाही. अशा स्थितीत काही सांगता येत नाही. होय, हे निश्चित आहे की धोनीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून काहीतरी नवीन असेल. मग ते जाहिरातीच्या पातळीवर असो किंवा संघाशी संबंधित. येत्या काही दिवसांत त्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.





