FIDE Candidates Chess Tournament 2024 : आर. प्रज्ञानंदची पहिल्या फेरीत बरोबरी…

FIDE Candidates 2024 :- भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझाला बरोबरीत रोखले. तर डी. गुकेशने विदित गुजरातीसोबतचा सामना ड्रॉ खेळला. पुरुष गटात पहिल्या दिवशीचे चारही सामने अनिर्णित राहिले.
त्याचवेळी भारताच्या आर. वैशालीने देशबांधव कोनेरू हंपीविरुद्ध बरोबरी साधली. रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याशिक्ना आणि कॅटरिना लाग्नो यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. चीनच्या टिंगजी लीला देशबांधव झोन्घाई टॅनकडून पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे, बल्गेरियाच्या नुरगुल सलीमोवाने अण्णा मुझीचुकला बरोबरीत रोखले. पुरुष गटात फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा यांचा सामना बरोबरीत सुटला तर अझरबैजानच्या निझात अब्बासोव्हने रशियाच्या इयान नेपोम्नियाचीला बरोबरीत रोखले.
FIDE Candidates 2024 : प्रज्ञानंदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा – मॅग्नस कार्लसन
दरम्यान, “कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीयांना विजेतेपदाची फारशी संधी दिसत नसली, तरी प्रज्ञानंदकडून मला चांगली कामगिरी अपेक्षित आहे. विजेतेपदासाठी फॅबियानो कारूआना आणि हिकारू नाकामुरा हे प्रमुख दावेदार आहेत”, असे मत पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने स्पर्धेपूर्वी व्यक्त केले होते.



