Ramdas Athawale : राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा, रामदास आठवलेंची मागणी

पालघर : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेमही आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आज त्यांनी पालघरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा अशी मागणी केली.
काय म्हणाले रामदास आठवले?
“राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही”, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारले. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते.
भाजपचा जोरदार हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यामुळे मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्त राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे आंदोलन करण्यात आले होते.





