Arsh Dalla Arrested : गँगस्टर डल्लाला भारताकडे सोपवण्याबाबत कॅनडाची टाळाटाळ

ओटावा : कॅनडामधील खलिस्तान समर्थक आणि भारतातील वॉन्टेड गँगस्टर अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्लाला अटक करण्यात आली आहे. कॅनडाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओंटारियोमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत डल्ला सामील होता. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, मात्र कॅनडाच्या जस्टिन ट्रूडो सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेण्यास नकार दिला आहे.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांना डल्लाच्या भारताकडे प्रत्यार्पणाबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांनी उत्तर टाळले आणि चौकशी सुरू असल्याने मी यावर बोलणार नाही, असे सांगितले. गरज भासल्यास आम्ही या विषयावर भारतीय मुत्सद्द्यांसोबत काम करू. मात्र, त्यानंतर त्यांनी विषय बदलला आणि कॅनडातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अर्श डल्ला हा घोषित दहशतवादी आहे, त्याच्यावर भारतात खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दहशतवाद यासह 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मे २०२२ मध्ये इंटरपोलने डाल्लाविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याशिवाय, गेल्या वर्षी 2023 मध्ये भारताने त्याच्या अटकेसाठी कॅनडाला विनंती केली होती, जी कॅनडाने फेटाळली होती.
Arsh Dalla Arrested : भारत सरकार करणार अर्श डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी – रणधीर जयस्वाल
कॅनडावर यापूर्वीच खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. खलिस्तानी समर्थक केवळ भारतातच नाही तर कॅनडातही गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा डल्लाला झालेली अटक हा पुरावा आहे. अर्श डल्लासारख्या दहशतवाद्यांविरोधात भक्कम पुरावे असतानाही कॅनडाचे ट्रूडो सरकार भारताला सहकार्य करण्यास कचरत आहे.





