Gangster Goldy Brar: भारताने वाँटेड घोषित केलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारचे नाव कॅनडाने ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतून काढले

अमृतसर – कॅनडाच्या सरकारने भारताने वाँटेड घोषित केलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारचे नाव ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतून काढून टाकले आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयामागे भारत आणि कॅनडामधील आधीच तणावपूर्ण संबंधांमधील वाद असल्याचे मानले जात आहे.
कॅनडामध्ये लपून बसलेल्या गोल्डी ब्रारवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप असून भारत सरकारने त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड नोटीसही जारी केली होती. कॅनडातील भारताचे माजी उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कॅनडाच्या सरकारने कुख्यात गुंड गोल्डी ब्रारचे नाव अनपेक्षितपणे त्यांच्या वॉन्टेड यादीतून काढून टाकले आहे.
ते म्हणाले की, कॅनडा अशा गुन्हेगारांना आणि अतिरेक्यांना आश्रय देत आहे जे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. ब्रारचे नाव कॅनडात हटवण्याचा निर्णय हा दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या राजनैतिक मुद्द्यांचा एक भाग आहे. कॅनडाच्या या वृत्तीतून अतिरेकाविरुद्ध कारवाईत सहकार्याचा अभाव दिसून येतो.
भारतीय अधिकाऱ्यांनी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यासह काही गुंडांची नावे कॅनडाला दिली आहेत जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल. असे असतानाही गोल्डी ब्रारचे नाव हटवण्याच्या निर्णयामुळे भारतातील सुरक्षा आणि न्यायाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.





