FIFA World Cup | विश्वकरंडक स्पर्धेसाठी कॅनडा पात्र
Updated On:

टोरांटो – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी कॅनडाचा संघ तब्बल 36 वर्षांनंतर पात्र ठरला आहे. पात्रता स्पर्धेच्या सामन्यात कॅनडाने जमैकाला 4-0 असे पराभूत करत ही कामगिरी केली. कॅनडाने 1986 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर मात्र, त्यांना एकदाही पात्रता मिळवता आली नव्हती.
विश्वचषक पात्रता फेरीच्या या सामन्यात कॅनडाकडून कायले लारिन, टाजोन बुकानन, ज्युनियर होइलेट व ऍड्रियन मारियापा यांनी गोल केले. अन्य पात्रता स्पर्धेच्या सामन्यात कर्णधार ख्रिस्टियन पुलिसिकने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नोंदवलेल्या पहिल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अमेरिकेने पनामावर 5-1 असा विजय मिळवला. त्यांना पुढील काळातील पात्रता स्पर्धेत आणखी एक सामना जिंकवा लागेल तरच ते विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.




