‘अमेरिकेशी सर्व जुने संबंध संपले’ ; कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केले मोठे विधान

Canada on US । कॅनडा आणि अमेरिकेतील दशकांपूर्वीचे संबंध नेहमीच एक उदाहरण राहिले आहेत. सखोल आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य, लष्करी पाठबळ आणि व्यापार करारांमुळे दोन्ही देश मजबूत भागीदार बनले होते, परंतु कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलेल्या एका विधानाने दोन्ही देशातील संबंध संपुष्टात आणले आहेत. कार्नी यांचे विधान आता या दोन्ही देशांच्या जुन्या संबंधांबद्दल एक मोठा प्रश्न उपस्थित करत आहे.
मार्क कार्नी यांनी यांनी “आता जुने संबंध संपले आहेत” हे विधान केले. त्यांचे हे विधान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वाहन आयातीवर २५ टक्के कर लादण्याच्या घोषणेनंतर आले आहे. कॅनडाच्या ऑटो उद्योगासाठी हा निर्णय अत्यंत विनाशकारी ठरू शकतो, कारण सुमारे ५,००,००० लोक या उद्योगाशी जोडले गेले आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयाला “अन्याय्य” म्हणत कार्नी म्हणाले की, हे दोन्ही देशांमधील विद्यमान व्यापार करारांचे उल्लंघन आहे.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
कराराचे उल्लंघन आणि कडक प्रतिक्रिया Canada on US ।
मार्क कार्नी यांनी असेही बजावले की “हे बदल केवळ व्यापार करारांपुरते मर्यादित नसावेत. ‘आता या नात्यात परत येणे शक्य नाही.’ ” असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. ट्रम्पच्या निर्णयानंतर कॅनडा आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये असलेला विश्वास आणि सहकार्य आता संपले आहे, हे त्यांच्या विधानावरून दिसून येते. कार्नी यांनी, “अमेरिकेने लादलेले शुल्क हे केवळ व्यापाराचा मुद्दा नाही तर दोन्ही देशांमधील खोल संबंधांवर हल्ला आहे.” असेही म्हटले आहे.
कॅनेडियन रणनीती Canada on US ।
मात्र, कार्नी यांनी स्पष्ट केले की कॅनडा या शुल्काविरुद्ध लढेल. ते म्हणाले, ‘या शुल्कांना तोंड देण्यासाठी आम्ही प्रभावी व्यापार उपायांचा अवलंब करू, ज्याचा अमेरिकेवर जास्त परिणाम होईल आणि कॅनडावर कमी.’ याचा अर्थ असा की कॅनडा अमेरिकेच्या या हालचालीला सर्व शक्तीनिशी विरोध करेल. सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित बाबींवर त्यांची रणनीती अधिक मजबूतपणे काम करेल” असेही कार्नी म्हणाले.
ट्रम्प यांच्याशी संबंधांची नवी दिशा
मार्क कार्नी यांनी असेही म्हटले आहे की,”त्यांनी ट्रम्पशी बोलण्यासाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे, परंतु कोणत्याही व्यापार चर्चेपूर्वी ट्रम्पने कॅनडाप्रती ‘आदर’ दाखवावा अशी त्यांची इच्छा आहे. कॅनडाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा त्यांचा संदेश स्पष्ट होता.
या नवीन दृष्टिकोनामुळे कोणते बदल होतील?
कॅनडासाठी हे एक मोठे पाऊल असू शकते, कारण ते आता अमेरिकेसोबतचे जुने संबंध एका नवीन दिशेने नेण्याचा मानस ठेवत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासन हा बदल समजून घेईल का आणि भविष्यात दोन्ही देशांमध्ये नवीन प्रकारची भागीदारी सुरू होईल का हे पाहणे बाकी आहे.





