पंतप्रधान मोदींना G7 शिखर परिषदेचे कॅनडाकडून आमंत्रण; कॅनेडियन खलिस्तानी भडकले

Narendra Modi | कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 15 ते 17 जून 2025 दरम्यान अल्बर्टा येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी मोदींना निमंत्रित केले आहे. शुक्रवारी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. मोदींनी कार्नी यांना निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या. यासंदर्भात मोदींनी एक्सवरून पोस्ट करत माहिती दिली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्व संबंधांमुळे या निमंत्रणाला विलंब झाल्याचे मानले जात होते.
पंतप्रधान मोदींनी लिहिले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी फोनवर बोलून आनंद झाला. या महिन्याच्या अखेरीस कानानस्किसमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने एकत्र काम करतील. शिखर परिषदेत भेटण्याची आम्हाला उत्सुकता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
Glad to receive a call from Prime Minister @MarkJCarney of Canada. Congratulated him on his recent election victory and thanked him for the invitation to the G7 Summit in Kananaskis later this month. As vibrant democracies bound by deep people-to-people ties, India and Canada…
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2025
गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची सुरू असलेली प्रगती पाहता भारताला G7 शिखर परिषदेसाठी निमंत्रित केलं जातं. यावर्षी मात्र भारत आणि कॅनडाच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भारताच्या निमंत्रणाबद्दल अनिश्चितता होती. मात्र, या निमंत्रणामुळे भारताचं जागतिक अर्थकारणातील महत्व अधोरेखित झालं आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश असलेल्या जी-७ शिखर परिषदांना पंतप्रधान मोदी यांनी २०१९ पासून सलग पाच वर्षे हजेरी लावली आहे. Narendra Modi |
खलिस्तानी समर्थकांचा रोष
दुसरीकडे, कॅनडामधील खलिस्तानी समर्थक गटांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याच्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ‘किल मोदी’ असे नारे देत जीवे मारण्याची धमकी दिली खलिस्तानी समर्थकांचा हा रोष हरदीप सिंह निज्जर या दहशतवाद्याच्या जून 2023 मधील हत्येनंतर वाढला आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, मात्र हे आरोप भारताने फेटाळून लावले होते.
हेही वाचा:





