Manoj Jarange : ‘उपोषण सोडा, समाजाला तुमची गरज आहे’; प्रशासनाच्या विनंतीनंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Manoj Jarange : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची केली विनंती

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणस्थळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी रात्री उशिरा भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 309 जणांनी बलिदान दिले असून, त्यांच्या वारसांना सरकारने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, 222 जणांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केले असून, हा मुद्दा शासन दरबारी सकारात्मक आहे, असेही त्यांनी सांगितले. 58 लाख कुणबी नोंदींच्या मागणीवर युद्धपातळीवर काम सुरू असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकाचे नाव जाहीर केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जात पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा प्रमाणपत्र रद्द झाल्यास, अपील करून आयुक्तांकडे दाद मागता येते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘समाजाला जरांगे पाटील, तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा,’ असे आवाहन करत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. (Manoj Jarange )
सर्व मागण्या राज्यस्तरीय, सरकार तुम्हाला उगाच पुढे करतयं – जरांगे
परंतु जरांगे उपोषणावर ठाम असून त्यांनी आशिमा मित्तल यांना विनंती करत म्हंटले, “कलेक्टर मॅडम, तुम्ही आलात पण या गोष्टी तुमच्या स्तरावरील नाहीत. या सर्व मागण्या राज्यस्तरीय आहेत. सरकार तुम्हाला उगाच पुढे करत आहे. या मागण्यांशी तुमचा थेट संबंध नाही, त्यामुळे तुमची एनर्जी वाया घालवू नका. मी तुमचा सन्मान करतो, पण मी तुमचे ऐकणार नाही. यानंतर तुम्ही येऊ नका,” असे मनोज जरांगे यांनी अशीमा मित्तल यांना सांगितले.
हेही वाचा:






