“विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढा”; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule | मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरील त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलनकांची संख्या वाढलेली आहे. राज्याच्या कानाकोऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, एकदिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले आणि २४ तासांत निर्णय घ्यावा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. Supriya Sule |
एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलवा
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की सर्व पक्षांना बोलवा, सर्वपक्षीय बैठक बोलवा. हवं तर एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढा. या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते भेट देण्यासाठी येत आहेत. मग जर कोणाचाही विरोध नसेल तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात तातडीने या संदर्भातील निर्णय घ्यावा. तुमच्याकडे 250 आमदार आहेत, बहुमत आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला बहुमत दिलं आहे, अधिवेशन बोलवा, चर्चा करा आणि निर्णय घेऊन टाका”, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.Supriya Sule |
सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव
दरम्यान, सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार घडला. यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी देखील गेल्याच्या पाहायला मिळाले. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.
हेही वाचा:
Pune News | पुणे विद्यापीठाचं संकेतस्थळ हॅक? ; थाई भाषेतील जुगाराच्या जाहिरातींचा गोंधळ





