Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद; ‘या’ ज्येष्ठ खासदाराच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ?
Union Cabinet Reshuffle 2026 :

Union Cabinet Reshuffle 2026 : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. या विस्तारात शिवसेना, तृणमूल, आपमधूनआलेल्या फुटीर खासदारांपैकी काहींना संधी, तर आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू दिली जाऊ शकतो.
ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर गेली. यामुळे केंद्रात वाढलेलं वजन वाढल्यानं शिवसेनेच्या पदरातही अधिकचं मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅबिनेट मंत्रीपद श्रीकांत शिंदेंना?
श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती आहे. तर एक राज्यमंत्रीपद ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीद्वारे समोर आली आहे. संजय जाधव सलग तिसऱ्यांदा परभणीचे खासदार म्हणून निवडणून आले आहेत.
मराठवाड्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचा विचार
प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष खात्याच्या स्वतंत्र प्रभाराबरोबरच आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव ज्येष्ठ खासदार आहेत.
संजय जाधव यांच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा शिवसेनेचा विचार आहे. मात्र, प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदापासून दूर करायचे का? यावरून शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा सुरू असल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होण्याआधी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्यामुळे या दोघांची नावं चर्चेत आहेत. मात्र लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या 30 जून रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:






