मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले चला पाहुयात… मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींची रक्कम थेट खात्यात जमा करणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार आहे. शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात येतील. अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामुल्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.