स्कूटर्स इंडिया गाशा गुंडाळणार ?
Updated On:

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील स्कूटर्स इंडिया ही कंपनी बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी अनेक वर्षापासून नफ्यात नाही. लॅंब्रेटा, विजय सुपर अशा प्रकारच्या स्कूटर ही कंपनी तयार करीत होती. आता या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कंपनीची जमीन उत्तर प्रदेश सरकारला परत करण्यात येणार आहे.





