Prajakta Mali : “बाय बाय…”; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ शेअर केला अन्…
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने १५ दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने याबद्दल इंन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांना कळवले आहे.

Prajakta Mali : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे (Prajakta Mali ) पाहिले जाते. प्राजक्ताने आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये अभिनय केला आहे. प्रेक्षक तिच्या कामाचे नेहमी भरभरून कौतुक करत असतात. ती देखील नेहमी आपल्या भूमिकेतून काहीतरी नवीनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दरवेळी करत असते.
सोशल मीडियावरील तिच्या पोस्टला तिचे चाहते कमेंट्स करत असतात. तिच्या अनेक पोस्ट विविध कारणांमुळे चर्चेतही असतात. नुकतीच अभिनेत्रीने अशी एक पोस्ट इंन्स्टाग्रावरून केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Prajakta Mali)
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने ”बाय बाय फोन… पुढच्या १५ दिवसांसाठी” असे कॅप्शन दिले आहे. साहजिक तिच्या कॅप्शनने चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. (Prajakta Mali)
View this post on Instagram
या पोस्टमधून प्राजक्ताने पुढील १५ दिवस ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या ती श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या आश्रमात गेली आहे. तिथे जाऊन प्राजक्ता पुढील १५ दिवस अध्यात्मात तल्लीन होणार आहे. त्यामुळेच १५ दिवस फोनपासून ती दूर असणार आहे. या दिवसांमध्ये चाहते तिचे फोटो आणि पोस्टला मिस करतील.
प्राजक्ता माळीच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ शोचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये प्राजक्ता माळी तिच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांचे मन जिंकते. याशिवाय ती हास्यजत्रेत स्कीट करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन आणि दाद देताना दिसते.





