Ajit Pawar : सध्या सगळ्यांचे लक्ष बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय बनली असून, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पणदरे गावातील मतदारांना भावनिक साद घातली आहे. महाराष्ट्राचं लक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. तुमच्या अजित पवार यांना पुन्हा राज्यात ताठ मानेने पाठवायचं का हे तुम्ही ठरवायचं, असे म्हणत अजित पवारांनी मतदारांना साद घातली आहे. पुढच्या पाच वर्षात मी माळेगावला 500 कोटी देणार आहे. तुमची सगळी काम हाच अजित पवार करणार असल्याचे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत. तसेच १९९१ साली अजित पवार पहिल्यांदा कारखान्याचे चेअरमन झाले होते. याविषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे. पुन्हा तेच विधान अजित पवार यांनी बोलताना चुलत्याच्या कृपने डायरेक्टर झालो असल्याचे विधान केले आहे. मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने मी डायरेक्टर झालो. 1991 साली शरद पवारांना काही जण म्हणाले, अजितला चेअरमन करा शरद पवार म्हणाले अरे थोडा अनुभव येऊ द्या मग करू, काय नाय करायचं म्हटले, पण त्यांना काय माहिती एकदा बँकेत आला की जायचा नाही. 35 वर्षे झालं बँक हातात घेतली सोडलीच नाही. असे अजित पवार म्हणाले. मी कामाच्या बदल्यात कधीही एक रुपया घेतला नाही. त्याच्यामुळे मी ताठ मानेने बोलतो आहे. सीएसपींची बदली करायला सात सात आठ कोटी दिले जातात, असे खळबळजनक विधानही अजित पवार यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले मी कधीही बदलीसाठी पैसे घेतले नाहीत. मला गरज नाही पैसे घ्यायची. अजित पवार यांंनी विविध गोष्टींवर भाष्य करत जावा मुंबईला दहा अकरा वाजेपर्यंत मंत्री भेटत नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणेपणे मंत्र्यांवर टीका केली आहे. मी कोणावरती टीका करत नाही पण खरं बोलतोय असेही ते बोलताना म्हणाले. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार येत्या २२ जूनला माळेगाव सरकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. तर २४ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वत: अध्यक्षपदासाठी उभे आहेत, दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली सगळी सूत्र शरद पवारांनी हाती घेतली आहे. हेही वाचा: राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर