पुणे जिल्हा | जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे
Updated On:

भोर, (प्रतिनिधी) – राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी भोर शहरातील कायम गजबजलेल्या मंगळवार पेठ या भागात हातात पोस्टर घेऊन, प्रत्यक्ष जनतेला भेटून मतदान करण्यासंबंधी जनजागृती केली.
मतदान केल्याने कार्यक्षम, समाज हित जोपासणारे उमेदवार निवडून येतील या करीता प्रत्येक मतदाराने मतदार करावयास या विषयीचे पोस्टर, बॅनरचा आकर्षक स्लोगनचा वापर करून जनजागृती करीत प्रभातफेरी काढण्यात आली.
या उपक्रमांसाठी प्राचार्या रुबिना सय्यद, स्वाती मोटकर यांच्या मार्गदर्शन खाली प्रा. सुजित चव्हाण, प्रा. सुलभा आंधळीकर, प्रा. संदेश साळुंखे, प्रा. संगीता भेलके, प्रा. दीपाली खामकर, प्रा. पूजा शेटे, प्रा. आकाश दांडेकर या शिक्षकांनी रॅलीचे नियोजन केले.





