भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्यालानेही व्यक्त केले दु:ख; म्हणाला “रतन टाटांनी…”

Ratan Tata Passed Away | ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा आजारी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झाले.
रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधननंतर राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. परदेशात फरार झालेला उद्योजक विजय माल्ल्यानेही रतन टाटा यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.
Very sad to hear of the passing away of Mr Ratan Tata. He was the epitome of dignity and grace at all times even whilst successfully leading India’s largest Industrial House. RIP Sir.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) October 9, 2024
विजय माल्ल्याने व्यक्त केले दु:ख
रतन टाटा यांच्या निधनानंतर विजय माल्ल्याने ट्विट करत लिहिले की, ‘रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. रतन टाटा हे प्रतिष्ठेचे आणि संयमी वृत्तीचे होते. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या उद्योजक घराण्याची धुरा समर्थपणे सांभाळली,’ असे विजय माल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. Ratan Tata Passed Away |
रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या घरी नेण्यात आले आहे. यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस (NCPA) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे ठेवण्यात येईल. यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





