Hingoli News : बसवरील चालक मद्यधुंद अवस्थेत; विद्यार्थिनीच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना, नेमकं काय घडलं?
Hingoli News : त्यामुळे तात्काळ या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून करण्यात आली.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा,सेनगाव,सापडगाव,सुकळी, दाताळा बुद्रुक,दाताडा खुर्द,वटकळी,सेनगाव मार्गावर धावणाऱ्या मानव विकासच्या बस वरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे आढळून आले असून मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
विद्यार्थिनींच्या लक्षात येतात विद्यार्थ्यांनी तात्काळ गाडी थांबवायला लावली तसेच दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनी देखील मानव विकासची बस अडवुन चालकाला जाब विचारला व त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ड्रायव्हरची तपासणी केली असता यामध्ये तो दारू पिल्याचे आढळून आला.
त्यामुळे तात्काळ या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून करण्यात आली. आज सायंकाळच्या सुमारास विद्यार्थिनींना घेऊन ही बस दाताडा मार्गे वटकळीच्या दिशेने जात असताना दाताडा परिसरात ही बस गावकऱ्यांनी अडवली यावेळी मोठा जमाव निर्माण झाला होता. त्यानंतर दुसरा ड्रायव्हर बोलावून ही गाडी हिंगोली आगारात नेण्यात आली.





