Bus Accidents In Pakistan : पाकिस्तानात बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात किमान 37 ठार…

इस्लामाबाद,कराची :- पाकिस्तानमध्ये आज झालेल्या प्रवासी बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात किमान ३७ जण ठार झाले. मृतांमध्ये ११ याक्षेकरूंचाही समावेश आहे. दोन्ही अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. यातील पहिला अपघात बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान कोस्टर हायवेवर झाला. सुमारे ७० शिया यात्रेकरूंना घेऊन ही बस पंजाब प्रांतात परत येत असताना झालेल्या अपघातात किमान ११ जण ठार झाले आणि ३५ जण जखमी झाले.
मकरान कोस्टल हायवे सिंध प्रांतातील कराची बंदर आणि बलुचिस्तान प्रातातीलग्वादर बंदराला जोडणारा ६५३ किलोमीटरचा महामार्ग आहे. बसमधील बहुतेक प्रवासी गुजरनवाला किंवा लाहोरचे रहिवासी आहेत.
या अपघातानंतर काही तासांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एक प्रवासी दरीत पडल्यामुळे २६ जण ठार झाले आणि तिघे जखमी झाले. डोंगराळ भागात झालेल्या या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.





