Bus Accident : खळबळजनक ! भरधाव बसची अनेक वाहनांना धडक; गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबईतील अंधेरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक अपघात (Bus Accident) घडला आहे. अंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर बेस्टच्या एका भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, बसने रस्त्यावरील तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली.

Bus Accident : मुंबईतील अंधेरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक अपघात (Bus Accident) घडला आहे. अंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर बेस्टच्या एका भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, बसने रस्त्यावरील तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १२ ते १३ रिक्षांचे प्रचंड नुकसान झाले असून २ ते ३ जण जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
अंधेरी स्थानक (पश्चिम) येथून सुटणाऱ्या बस क्रमांक २४२ या मार्गावरील बसच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण (Bus Accident) सुटले. नियंत्रण सुटलेली ही बस समोर येणाऱ्या वाहनांना धडकत पुढे गेली. या अपघाताचा फटका प्रामुख्याने तिथे उभ्या असलेल्या रिक्षांना बसला. बसने इतक्या वेगाने धडक दिली की, १२ ते १३ रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
जखमींना रुग्णालयात केले दाखल
या अपघातामध्ये प्राथमिक माहितीनुसार २ ते ३ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परता दाखवत जखमींना (Bus Accident) तातडीने उपचारासाठी जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.
चालकाचा ‘ब्रेक फेल’चा दावा; पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेस्ट चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान, “बसचे ब्रेक फेल झाले होते”, असा दावा चालकाने केला आहे. पोलीस या दाव्याची सत्यता तपासत असून, अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे याचा तपास करत आहेत.
बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
गेल्या काही महिन्यांत बेस्ट चालकांच्या चुकीमुळे किंवा गाड्यांच्या देखभालीअभावी अपघातांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे बेस्टच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






