Nilesh Lanke | मतदार संघातील दहशतीला गाडून आमदाराला नामदार करा : खासदार नीलेश लंके

राहुरी, (प्रतिनिधी): आमदार प्राजक्त तनपुरे विकासाचा झंझावात आहेत. तो बघता यंदा गुलाल हा आपलाच आहे. मागील पाच वर्षांत विकासाची कामे करणाऱ्याला आपल्याला पुन्हा निवडून द्यायचे आहे. समोरच्या उमेदवाराला कायमचेच घरी बसवायचे आहे. मतदार संघातील दहशतीला गाडून कामदार, ऊर्जावान आमदाराला आता आपल्याला नामदार करायचे आहे, असा विश्वास खा.नीलेश लंके यांनी व्यक्त केला
नगर तालुक्यातील जेऊर बाईजाबाई येथे महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खा.लंके बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस नगर तालुकाध्यक्ष माधुरी धुमाळ, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, शरद झोडगे, अॅड. अभिजित भगत, प्रकाश देठे, गोविंद मोकाटे, विजय डौले, राहुरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, रामदास ससे, रघुनाथ झिने, बंडू रोहोकले, शेंडीचे सरपंच रामेश्वर निमसे आदी उपस्थित होते.
खा. लंके म्हणाले की, शिवाजी कर्डिले हे जर निवडून आले तर ते राहुरीचा बिहार करण्यास देखील मागे पुढे बघणार नाहीत. हे दिवसाढवळ्या आपल्याला हिंडून देणार नाहीत. ही जर दहशत मोडून काढायची असेल तर तनपुरे यांना साथ द्या.सत्तेचा वापर त्यांनी विकासासाठीच केला.
ऊर्जाखात्याच्या माध्यमातून मतदारसंघांमध्येच नव्हे तर राज्यामध्ये नावलौकिक मिळविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. कर्डिले यांच्याबरोबर फिरणाऱ्यांचे मला फोन येत आहेत. दबावामुळे आम्हाला त्यांच्यासोबत प्रचार करावा लागत आहे. तुम्ही राहुरीकर आमदार नव्हे तर नामदार निवडून देणार आहात. प्राजक्त दादांना मतदान म्हणजे दहशत संपविण्यासाठी मतदान द्यायचे आहे. मला जसे मताधिक्य दिले तसे आता दादांना मताधिक्य द्यायची जबाबदारी जेऊरकरांची आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, बागायती जमिनी एमआयडीसीसाठी घेता येत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यमंत्री आदिती तटकरे होत्या . त्यावेळी जमीन एमआयडीसीला न देण्याचा ठराव एमआयडीसीकडून करून घेतला आणि त्या सर्वांच्या जमिनी वाचवण्याचे काम केले.
खासदार साहेब म्हणाले की जमीन हडप करायचा काही लोकांचा धंदा असतो .आपण मात्र शेतकऱ्याच्या जमिनी वाचवण्याचे काम या तालुक्यांमध्ये केले आहे. जेऊर येथील सभेत सरपंच काळे, उद्धव दुसुंगे, प्रा. शशिकांत गाडे, संपत म्हस्के, सरपंच नाथाभाऊ चव्हाण, भैय्यासाहेब पवार, शरद धोडगे, गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, अभिषेक भगत यांनी मनोगत व्यक्त केले.





