Pune News : दारू पिण्यासाठी रिक्षांचे टायर, बॅटरी चोरणारा सराईत चोरटा अटकेत
Pune News : दारू पिण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर आणि बॅटरी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News : दारू पिण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी रिक्षांचे टायर आणि बॅटरी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. सुरेश किशोर वाघमारे (वय ३२, रा. महात्मा फुले वसाहत, १३ ताडीवाला रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रिंगसह १६ टायर आणि दोन बॅटऱ्या असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune News)
युवराज करिष्मा नाईक (वय ४१, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांची रिक्षा पंचशील चौकातील यास्मिन मंजिल इमारतीजवळ उभी होती. १७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या रिक्षाचे रिंगसह दोन टायर आणि एक बॅटरी चोरून नेली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune News)
या गुन्ह्याचा तपास करताना बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरेश वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता त्याला अटक केली. (Pune News)
आरोपीकडून फिर्यादीच्या रिक्षाचे चोरीला गेलेले टायर व बॅटरी यांसह एकूण १६ टायर रिंगसह आणि दोन बॅटऱ्या असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दारू पिण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने रिक्षांचे टायर चोरल्याचे आरोपीने तपासात सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. (Pune News)
Pune News : दुष्काळात तेरावा महिना.! जलवाहिनी फुटून दहा लाख लिटर पाणी वाया





