Thane News : मोठी बातमी..! शोरमा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु
Thane News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Thane News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून एका गर्भवती महिलेसह अकरा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Thane News)
बाधित व्यक्तींनी सोमवारी रात्री भिवंडीच्या वंजरपट्टी नाका परिसरातील एका खानावळीत हा पदार्थ खाल्ला होता. काही लोकांनी शोरमा खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर आणि जुलाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या, असे भिवंडी-निझामपूर शहर महानगरपालिकेचे (बीएनसीएमसी) वैद्यकीय आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांनी सांगितले. (Thane News)
एका गर्भवती महिलेसह अकरा बाधित व्यक्तींना भिवंडी येथील इंदिरा गांधी मेमोरियल (आयजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढू शकते. रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले. (Thane News)
रुग्णांच्या शौचाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी पाहणी आणि चौकशी करण्यासाठी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. स्थानिक पोलीसही या घटनेचा तपास करत आहेत. बीएनसीएमसी आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे गाडेकर म्हणाले. (Thane News)
Thane News : ठाण्यात मोठी कारवाई ! 9 लाखांहून अधिकची अवैध दारू जप्त





