राम चरण आणि कियाराच्या ‘गेम चेंजर’ची बंपर ओपनिंग; पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती?

Game Changer Collection | दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘गेम चेंजर’ चित्रपट 10 जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटाच्या गाण्याने सुरुवातीलाच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली. आता राम चरणच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे.
‘गेम चेंजर’ची बंपर ओपनिंग झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘गेम चेंजर’चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 51.25 कोटी रुपये कमावले आहेत. ‘गेम चेंजर’ या चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत.
‘गेम चेंजर’ पाच भाषांमध्ये रिलीज
‘गेम चेंजर’ चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळ भाषांचा समावेश आहे. ‘गेम चेंजर’चित्रपटाने तेलुगु भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. तेलुगु 42 कोटी कमावले आहेत. तर तमिळमध्ये 2.1, हिंदीत 7 कोटी, कन्नडमध्ये 0.1 कोटी आणि मल्याळम भाषेत 0.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपट किती कमाई करतो हे पाहावे लागेल. Game Changer Collection |
View this post on Instagram
निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये, ‘किंग साइज एन्टरटेन्मेंटचा धमाका थिएटरमध्ये. 2025 मधील सर्वात मोठा एन्टरटेनमेंट असलेल्या गेम चेंजरने बॉक्स ऑफिसवर धमाका केला,’ असे लिहिले आहे.
ब्लॉकबस्टर गेम चेंजरने पहिल्या दिवशी जगभरात 186 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, ‘गेम चेंजर’ हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. ‘गेम चेंजर’मधील राम चरण आणि कियाराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Game Changer Collection |
हेही वाचा:
रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? ‘त्या’ इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेला उधाण





