भिर्रर्रर्रर्रर्र…! महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट

Bullock Cart Race । राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बैलगाडी शर्यत फक्त मनोरंजनाची गोष्ट नसून ग्रामीण भागातील यात्रा (जत्रा), उरुस, महोत्सव यामध्ये बैलाच्या शर्यती हे मुख्य आकर्षण असते.
गावपातळीवर बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळते. मात्र, अश्यातच सांगलीच्या कासेगावमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ( Bullock Cart Race )
ही शर्यत अनोखी असणार आहे, कारण यातील विजेत्याला हटके बक्षीस मिळणार आहे. आतापर्यंत बैलगाडी विजेत्यांला थार गाडी आणि लाखोंची बक्षीसं देण्यात आली आहेत. अशा अनेक बक्षीसांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ( Bullock Cart Race )
मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क ‘1 बीएचके फ्लॅट’ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल खुलासा केला आहे. आणि त्यामुळे सध्या या शर्यतीची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैलगाडी स्पर्धेतील पहिल्या विजेत्यास 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येईल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ( Bullock Cart Race )





