Satara : राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम व संस्कारांची जडणघडण

सातारा : राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमाचे मूल्य शिकविणारी तसेच संस्कार घडविणारी योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांने श्रमसंस्कार शिबिर पूर्ण केले तो विद्यार्थी कोठेही कमी पडत नाहीत. सर्व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन ते कार्य यशस्वी करतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी विकास देशमुख बोलत होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी सात दिवसांत फार मोलाचे कार्य केले आहे.एका टेकडीवर ज्या ठिकाणी कोणतेही वाहन जात नाही अशा ठिकाणी सपाटीकरण करून मैदान तयार केले. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे,असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रि. डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, शालेय जीवन माणसाचे शिक्षण आणि सामाजिक विकास घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.शालेय जीवन हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम जीवन असते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी उपयुक्त असून स्वयंसेवकांनी समाजाच्या गरजा व समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. यावेळी विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहायक विभागीय अधिकारी दिनेश दाभाडे , संस्थेच्या आजीव सभासद बोर्डाचे सचिव प्रा.संदीप भुजबळ उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिरात श्रमदान, आरोग्य तपासणी, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन इ.उपक्रम राबविले.प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मराठी वाहिनीवरील ‘लागिर झालं जी’ ‘आप्पी आमची कलेक्टर’ या व इतर मालिकेत अभिनेता संतोष पाटील यांनीही विशेष भेट देऊन आपल्या आठवणी सांगितल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक एस.व्ही.जाधव, व्ही आय.शिंदे, लाईफ वर्कर प्रदीप कुंभार, जिल्हा समन्वयक प्रा.अरविंद जगताप,प्रा.अभय पाटील,प्रा.विक्रम निकाळजे,प्रा.सुभाष पाटील,प्रा.राजेंद्र कदम,प्रा.संजय जगताप, प्रा.अजित फाळके,प्रा.विशाल संदे,प्रा.उर्मिला तांदळे,प्रा.शांता निकम, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले. अपूर्वा कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा.गणेश लोहार यांनी केले. अमृता पवार यांनी आभार मानले.





