पिंपरी | अण्णाभाऊ साठे पुतळ्याची दक्षता घेत निगडी मेट्रो स्टेशन उभारा

पिंपरी, (प्रतिनिधी) – निगडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मेट्रो स्टेशनचे काम चालू आहे. या कामामुळे पुतळ्याला कोणतीही बाधा येऊ नये; तसेच पुतळ्याचे योग्य सुशोभीकरण करूनच मेट्रो स्टेशनचे विस्तारीकरण करा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पुण्यातील मेट्रोच्या मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड येथील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांसमवेत मेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांची बैठक पार पडली.
या बैठकीत स्थानिक समाजाच्या लोकभावना आमदार गोरखे यांनी मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येऊ नये .पुतळा परिसराची योग्य असे सुशोभीकरण करावे.
या स्थानकास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे- भक्ती शक्ती स्थानक असे नाव द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. समाजाच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वाशन महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिले.
या बैठकीला आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, माजी अध्यक्ष भगवान शिंदे, नाना कसबे, सतीश भवाळ, सुनील भिसे, अरुण जोगदंड, संजय ससाणे, नितीन घोलप, बाळासाहेब रसाळ, नाना कांबळे, शिवाजी साळवे, मारुती जाधव, शंकर खवळे, रोहन भिसे, धीरज वाघमारे, महेंद्र क्षीरसागर, विवेक बुचडे, सुरेश चव्हाण, नाथा शिंदे आदी उपस्थित होते.





