Budget 2022 : अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – मोदी सरकारचा 10 वा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर माजी मुख्यमंत्री व भापज नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रिक्रिया दिली आहे. ”भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.” अशा शब्दात फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.
सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, @nsitharaman जी यांचे खूप खूप आभार!#AatmanirbharBharatKaBudget— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2022
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे खूप खूप आभार!” #AatmanirbharBharatKaBudget असे ट्वीट करत अर्थसंकल्पावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.





