Budget 2021 : गरीब आणि मध्यमवर्गियांना दिलासा नाही – संजय राऊत

मुंबई – केंद्र सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गियांना दिलासा मिळेल अशाच घोषणा व्हायला पाहिजे होत्या. पण असे न झाल्याने गरीब आणखी गरीब होणार आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवरून उद्योजक आणि कारखान्यांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. देशातील उद्योगांना मुक्तपणे व्यापार करता यावा, त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला करावा जेणेकरून देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात मदत होईल असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउत यांनी केंद्राला जीएसटीच्या मुद्द्यावरून टोला लगावला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मार्फत गोळा केलेल्या करातून केंद्राने महाराष्ट्राचे पैसे देणे आहेत. महाराष्ट्राला त्यांनी ते लवकरात लवकर परत करावे. एवढेच नव्हे तर करोनाविरोधात आलेली लस सर्वांनाच मोफत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





