जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफ टीमची बस दरीत कोसळली; 3 जवानांचा मृत्यू

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. निवडणुकीसाठी तैनात असलेल्या जवानांना घेऊन जाणारी बस ब्रेल गावातील खोल दरीत कोसळली.
या बसमध्ये 36 जवान प्रवास करत होते. यापैकी तीन जवानांचा मृत्यू झाला. तर बस चालकालाही 28 जणांना दुखापत झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून 2024 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तैनातीसाठी सैनिकांसह बडगामला जात होती, त्यादरम्यान हा अपघात झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान संपन्न झाले. निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्याचे मतदान २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. २६ विधानसभा मतदारसंघात होणार असलेल्या मतदानासाठी ३६ जवानांची तुकडी रवाना होत होती. यावेळी बडगाव जिल्ह्यातील ब्रे गावानजीक दरीत कोसळून बसचा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास बीएसएफ जवानांना घेऊन पुलवामाहून बडगामला जाणारी बस त्यांच्या पोलीस चौकी वॉटरहॉलच्या अवघ्या 600 मीटरवर दरीत पडली. सीआरपीएफ, बीएसएफ, नागरी पोलीस आणि नागरिकांनी जखमी सैनिक आणि बस चालकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे बसचा चक्काचूर झाला असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या बीएसएफ जवानांना गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा:
‘तिरुपती बालाजी मंदिराला कधीच तूप पुरवले नाही’ ; लाडूंच्या वादाच्या प्रकरणात अमूलचे स्पष्टीकरण




