गुजरातमध्ये उष्माघाताने बीएसएफ अधिकाऱ्यासह जवानाचा मृत्यू

BSF officer | Gujarat – गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील हरामी नाला खाडी परिसरात गस्तीदरम्यान उष्माघाताने सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी आणि एक जवानाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
कच्छच्या रण आणि हरामी नाला भागात सध्याचे तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान असून आर्द्रतेचे प्रमाण 80 ते 82 टक्के इतके आहे. सहाय्यक कमांडंट विश्व देव आणि हेड कॉन्स्टेबल दयाल राम यांना उष्माघात आणि डिहायड्रेशन झाल्याची घटना शुक्रवारी सीमेवर घडली.
या दोन जवानांना सायंकाळपर्यंत भुज येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्यांना वाचवता आले नाही. देव हे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 59 व्या बटालियनमध्ये होते.
दरम्यान, मे महिन्यात राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या एका जवानाला उष्माघातामुळे जीव गमवावा लागला होता.





