BSc Nursing : नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ‘गुड न्यूज’! भारतीय परिचारिका परिषदेने दिली प्रवेशासाठी मुदतवाढ, लगेच अर्ज करा

Updated On:
BSc Nursing : नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ‘गुड न्यूज’! भारतीय परिचारिका परिषदेने दिली प्रवेशासाठी मुदतवाढ, लगेच अर्ज करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतीय परिचारिका परिषदेकडून परिचारिका अर्थात बीएसस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरीय फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या फेरीसाठी राज्य सीईटी सेलने नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मात्र नोंदणी करता न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. संस्थास्तरीय फेरीचे सीईटी कक्षाकडून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची मागणीची दखल घेऊन भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमाला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला, तसेच नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये (कॅप) नोंदणी करणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देण्याचे निर्देश सीईटी कक्षाला दिले आहेत. त्यानुसार सीईटी कक्षाने नव्या संस्थास्तरीय फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे, तसेच या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रवेश शुल्क ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांची ६ नोव्हेंबर रोजी एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर होईल. अर्ज करणारे विद्यार्थी संस्थास्तरीय फेरीसाठी पात्र ठरणार असून, यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nursing Admission : खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात! ७ नर्सिंग कॉलेजेसमध्ये 'शून्य' प्रवेश

2026-01-25 06:45:43

Nursing Admission : खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात! ७ नर्सिंग कॉलेजेसमध्ये 'शून्य' प्रवेश

Nursing CET 2026 : नर्सिंग सीईटीचे वेळापत्रक जाहीर! आजपासून नोंदणी सुरू; अर्ज करण्यापूर्वी 'हे' महत्त्वाचे बदल वाचा

2026-01-24 06:15:26

Nursing CET 2026 : नर्सिंग सीईटीचे वेळापत्रक जाहीर! आजपासून नोंदणी सुरू; अर्ज करण्यापूर्वी 'हे' महत्त्वाचे बदल वाचा