जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावातील कानसवाडा येथे एका माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि. २१) सकाळी घडली आहे. गावातीलच तिघांनी माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हल्लेखोरांनी चाकू आणि चॉपरच्या मदतीने उपसरपंचावर सपासप वार केले. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज कोळी हे जळगाव जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच आहेत. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. गावातीलच तिघांनी सकाळी आठच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहेत. गुदद्वारात पाण्याचा फवारा मारल्याने तरुणाचा मृत्यू धुलीवंदनाच्या दिवशी तीन मित्रांनी मिळून पाण्याचा फवारा मित्राच्या पॅन्टीत मारला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सत्यप्रकाश उपाध्यायचा असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कल्याणमधील टिटवाळा येथे धुलीवंदनाच्या दिवशी घडली आहे. दारू पिऊन धुलीवंदन साजरे करताना आपण आपल्या मित्रासोबत काय करतोय, हेच या लोकांना कळले नाही. त्यांनी सत्यप्रकाश उपाध्याय याच्या गुदद्वारात जोरदार पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे अंतर्गत इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तिघा मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा अशी या तीन मित्रांची नाव असून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.