वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; राज्य महिला आयोगाकडून दखल, काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? पाहा…..

Rupali Chakankar | Vasai News : वसईत दिवसा-ढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुंबईनजीकच्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते.
कोणीच आरोपीला थांबवले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.
मात्र, अश्यातच आता या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. रूपाली चाकणकर यांनी आरोपीवर आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश दिले आहेत. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या,
वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.
वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 18, 2024
पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे, सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल.मुलांचे असे हिंसक वागणे, हत्या करण्यापर्यंत मजल जाणे आणि सोबतच अशी घटना घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणे चिंताजनक आहे. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.





