पत्रकार मुकेश चंद्राकरची निर्घृण हत्या; सेप्टिक टँकमध्ये आढळला मृतदेह; काय आहे नेमकं प्रकरण?

Journalist Mukesh Chandrakars Case | छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते बेपत्ता होते. त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. रस्ते बांधणीतील 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या
कंत्राटदार आणि त्यांचे नातेवाईक सुरेश चंद्राकर यांच्या घराच्या परिसरात बांधलेल्या सेप्टिक टँकमधून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने उपस्थित होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विजापूरमध्ये रास्ता रोको
याप्रकरणी संतप्त झालेल्या पत्रकारांनी आज शनिवारी विजापूरमध्ये रास्ता रोको केला आहे. विजापूरसह बस्तर विभागातील पत्रकार रस्त्यावर धरणे धरुन बसले आहेत. Journalist Mukesh Chandrakars Case |
हत्येमागचं कारण काय?
काही दिवसांपूर्वी पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी 120 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यातील भ्रष्टाचाराचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. हे काम ठेकेदार सुरेश चंद्राकर यांनी केल्याचे बोलले जात आहे.
यावरून मुकेश चंद्राकर आणि ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे पत्रकाराच्या हत्येचा संबंध सुरेश चंद्राकर यांच्याशी जोडला जात आहे. या प्रकरणी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावालाही पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. तर कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार आहे. Journalist Mukesh Chandrakars Case |
काही दिवसांपासून मुकेश चंद्राकर होते बेपत्ता
कुडोली, मीर्तूरचा रस्ता नव्याने तयार झाला आहे. सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी पत्रकार मुकेश यांनी रायपूर येथील मित्रासह या रस्त्यातील भ्रष्टाचाराचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मुकेश चंद्राकर आणि त्यांचे नातेवाईक सुरेश चंद्राकर यांच्यात वाद झाला. पत्रकाराशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 1 जानेवारी रोजी एक व्यक्ती मुकेश चंद्राकर यांच्या घरी पोहोचली आणि त्यांना एका ठिकाणी जाण्यास सांगितले. तेव्हापासून मुकेश चंद्राकर बेपत्ता होते.
त्यानंतर पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी मुकेशचा शोध घेत होती. अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले. यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा:
निराशजनक कामगिरीनंतर वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट पाहता येणार ओटीटीवर





