जुन्नरच्या विकासासाठी भरीव निधी आणला – अतुल बेनके

नारायणगाव – जुन्नर विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी पवार गटाचे अधिकृत उमेदवार आमदार अतुल बेनके यांचा जोरदार प्रचार सुरू असून ग्रामस्थही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अतुल बेनके यांनी सोमवारी (दि.4) दातखिळवाडी, काले, येणेरे, विठ्ठलवाडी (येणेरे), काटेडे, पारुंडे, चिंचोली, विठ्ठलवाडी (वडज), वडज, कुसुर, धामणखेल, निमगाव तर्फे म्हाळुंगे, निमदरी, खिल्लारवाडी, सावरगाव परिसरात गाव भेट दौरा केला.
यावेळी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणला असून पुढील काळातही जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले. प्रचार दौर्यात गावोगावी स्थानिकांनी स्वागत करून पाठीशी असल्याचे सांगितले.
आमदार बेनके यांनी प्रचार करताना मतदारांना आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. त्यामध्ये मीना खोर्यासाठी वडज उपसा योजनेला 35 कोटी मंजूर केले असून जुन्नर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबवून जास्तीत जास्त महिलांना आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. शेतकर्यांचे वीज बिल माफ केले तसेच मोफत तीन सिलेंडर योजना प्रभावीपणे राबविली असल्याचे सांगितले.
यावेळी तानाजी तांबे, अरुण पारखे, तानाजी सर, बाळा सदाकाळ, पूजा बुट्टे पाटील, प्रकाश ताजणे, सुरेश चिलप, दत्तात्रयची, उत्तम चिलप, संतोष चिलप, ज्ञानेश्वर चिलप, अनिकेत चिलम, अभय चिलप, सरपंच खंडू काशीद, वैभव खराडे, बिलालभाई चौघुले, इसाफभाई चौघुले, भाऊसाहेब काशीद, महिला आघाडी प्रमुख वंदना काशीद, संजय काशीद, बबडी जाधव, बबन दुर्गुडे, मयूर पवार, आदित्य पवार, सुभाष आंद्रे, मुरलीधर पवार, संतोष जाधव, प्रसाद पवार, भास्कर पवार, स्नेहल पवार, नयना पवार, शोभा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्याच्या डीपीआर मध्ये प्रमुख तीर्थक्षेत्र, लेणी समूह, शिवनेरी यासाठी अधिकचा निधी उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या गावातील सरपंचांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी निधी दिला आहे. आमदार बेनके यांनी शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, मागील पाच वर्षांत धरणातील पाण्याचे केलेले नियोजन, उपसा सिंचन योजना, शेतकर्यांसाठी साडेसात एचपी पंपाची विज बिलमाफी, वाडी-वस्त्यांना जोडलेले रस्ते आदी कामांवर परिसरातील जनता खुश आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे काम बेनके यांनी केले आहे. भाजपाचे मूळ कार्यकर्ते विकासाच्या मुद्द्यावर बेनके यांच्या सोबत राहतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
“आमदार बेनके यांनी धामणखेल, कुसुर, निमगाव तर्फे म्हाळुंगे यासह सावरगाव धालेवाडी गटातील 26 ते 30 गावांना 109 कोटी 19 लक्ष 94 हजारांचा भरीव विकासनिधी मिळाला आहे. बेनके यांनी केलेल्या विकास कामांमुळे आमच्या परिसरातील जनता त्यांच्या पाठीशी खात्रीशीर उभी राहील.”
– संतोष जाधव, माजी सरपंच, धामणखेल





