“मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा”; कंगणाचे पुन्हा एकदा विधान चर्चेत

Kangana Ranaut Statement | भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. यातच आता कंगणा यांनी केलेले एक विधान चांगले चर्चेत आले आहे. “मला भेटायचे असेल तर मंडी लोकसभा मतदारसंघाचे आधार कार्ड आणावे लागेल, तसेच, भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा,” असे विधान कंगना यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाली कंगना रणावत ?
कंगना यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले की, “माझं मंडी सदरमध्ये ऑफिस आहे. हा त्याचा पत्ता आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशा परिस्थितीत भेटायला येणाऱ्या लोकांना मंडी परिसराचे आधार कार्ड सोबत आणावे लागेल. तसेच, तुमच्या संसदीय कामकाजासाठी तुम्हाला जी काही अडचण असेल, ती तुम्हाला लेखी स्वरूपात आणावी लागेल, जेणेकरून लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. मोठ्या संख्येने लोक येथे येतात, त्यामुळे असे केले जात आहे.” Kangana Ranaut Statement |
कंगना पुढे म्हणाल्या की, “तुम्ही मंडीचे असाल तर मंडी सदर येथील कार्यालयात या. तुम्ही हिमाचलचे असाल तर कुल्लू-मनाली येथील माझ्या घरी येऊन भेटा. जर आपण एखाद्या समस्येवर एकत्र चर्चा केली तर ती सोडवणे सोपे जाते. संसदीय मतदारसंघाशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही केंद्राशी संपर्क साधू शकता. राष्ट्रहिताशी निगडीत काही बाब असल्यास आम्हाला सांगा, आम्ही लोकसभेत आवाज उठवू.” Kangana Ranaut Statement |
मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी
दरम्यान, भारतीय जनता पार्टीने अनपेक्षितपणे कंगना यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. येथे कंगनाची स्पर्धा काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्याशी होती. कंगनाला निवडणुकीत 5,37,022 मते मिळाली तर विक्रमादित्य सिंह यांना 4,62,267 मते मिळाली. कंगनाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि 72 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.
हेही वाचा:
हातात पिस्तूल अन्…; पूजा खेडकर यांच्या आईकडून शेतकऱ्यांना दमदाटी; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल





