‘दहशतवाद हा जागतिक धोका, एकत्र येऊन लढाले लागेल’

सेंट पीटर्सबर्ग : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सेंट पीटर्सबर्ग येथील ब्रिक्स एनएसए बैठकीत ते सहभागी झाले. दिवसाच्या पहिल्या भागात सत्रादरम्यान, त्यांनी दहशतवादासह आधुनिक सुरक्षा आव्हानांचा सामना करण्याच्या गरजेवर भर दिला. दहशतवाद हा जागतिक धोका असून त्याविरूद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढावे लागले असे त्यांनी म्हंटले. यापूर्वी त्यांनी 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या 13 व्या BRICS NSA बैठकीत भाग घेतला होता. गेल्या वर्षी पाच नवीन सदस्य सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इराण, इजिप्त आणि इथिओपिया या गटात सामील झाले होते. यानंतर, ही पहिली BRICS NSA बैठक आहे.
NSA Shri Ajit Doval is participating in the BRICS NSAs meeting in Saint Petersburg, Russia. During the sessions in the first half of the day, he spoke on modern security challenges including ICT related issues and terrorism and the need to address them through joint efforts… pic.twitter.com/Pn54S3zxH9
— India in Russia (@IndEmbMoscow) September 11, 2024
ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी एनएसए स्तरावरील बैठक अत्यंत महत्त्वाची –
या बैठकीचा मुख्य भर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यावर असेल, अशी चर्चा आहे. या बैठकीद्वारे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी ही एनएसए स्तरावरील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार –
येत्या ऑक्टोबरमध्ये रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनला भेट दिली होती. दुसरीकडे, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो –
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेत म्हटले होते की, रशिया-युक्रेन युद्धाच्या निराकरणात भारत, ब्राझील आणि चीन मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. रशिया आणि युक्रेनमध्ये कोणते देश मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात, असा प्रश्न पुतीन यांना विचारला असता त्यांनी भारत, ब्राझील आणि चीनची नावे घेतली. दरम्यान, BRICS हा जगातील पाच देशांचा समूह आहे ज्यांना जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.





