Shashi Tharoor : “ब्रिक्सला आहे मोठे जागतिक महत्त्व..”; शशी थरूर यांचा आंतरराष्ट्रीय संमेलनाला पाठिंबा
ब्रिक्स देश जगाच्या बहुसंख्य लोकसंख्येचे आणि जागतिक जीडीपीच्या ४१ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात, असेही त्यांनी नमूद केले.

Shashi Tharoor – ब्रिक्सचे संमेलन हा एक जागतिक परिषदेसाठी भारताला मिळत असलेला मोठा सन्मान आहे. हा गट ग्लोबल साउथसाठी अर्थात विकसनशील आणि उदयोन्मुख देशांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि मुत्सद्दीच्या पातळीवर विविध देशांना एकत्र आणण्याची क्षमता भारत दर्शवतो.
अशा संमेलनांमध्ये होणारे द्वीपक्षीय करारही मोलाचे असतात, असे सांगत थिरुवनंतपुरचे खासदार आणि ज्येष्ठ काॅंग्रेस नेते शशी थरूर यांनी ब्रिक्सच्या आयोजनाला पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ब्रिक्स गटाकडून भारताला मिळालेल्या ठोस फायद्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यानंतर, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ब्रिक्स शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणजेच ब्रिक्सच्या मुद्यावरुन पक्षात एकी नसल्याचे दिसून आले आहे.
ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी बोलताना थरूर म्हणाले की, ११ देशांचा हा गट जगाची लोकसंख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा प्रतिनिधित्व करतो.
ग्लोबल साउथमध्ये १०० हून अधिक देशांचा समावेश आहे, परंतु येथे आपल्याकडे ग्लोबल साउथचे ११ प्रमुख देश आहेत जे एकत्रितपणे विविध दृष्टिकोनांचे प्रतिनिधित्व करतात.
ब्रिक्स देश जगाच्या बहुसंख्य लोकसंख्येचे आणि जागतिक जीडीपीच्या ४१ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय मुत्सद्देगिरी महत्त्वाची
थरूर यांनी पुढे सांगितले की, या गटाकडे जगातील इतर देशांनी अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सदस्य देशांचे आणि निरीक्षकांचे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख यात सहभागी होत असल्याने, या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणे ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब आहे.
हे भारताची प्रमुख जागतिक शक्तींना एकत्र आणण्याची क्षमता दर्शवते. हे भारताची एक विशिष्ट प्रकारची राजकीय मुत्सद्दी क्षमता दर्शवते, ज्याला जागतिक स्तरावर स्वतःचे असे महत्त्व आहे.





