लाच प्रकरण : पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन

इतर चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेले पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना कौटुंबिक कारणासाठी तात्पुरता जामीन मिळाला आहे. दरम्यान उर्वरित चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला अहे.

त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रताप परदेशी, ऍड. गोरक्षनाथ काळे, ऍड. किर्तिकुमार गुजर, ऍड. संजय दळवी, ऍड. विपुल दुशिंग आनि ऍड. अमर लांडगे यांनी काम पाहिले. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे. अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. कौटुंबिक कारणासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ऍड परदेशी आणि ऍड. काळे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

लाचेच्या या प्रकरणात लांडगे यांच्यासह त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय , रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.