Breaking News : ‘RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

RCB Victory Rally : आरसीबी संघाने आयपीएल 2025 जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र, या सन्मानादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
प्रत्यक्षात, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत 20 जण गंभीर जखमीही झाले आहेत. तर 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
Bengaluru: Fans faint at Chinnaswamy Stadium as crowds rush to get in for RCB team felicitation event #Bengaluru #RoyalChallengersBengaluru #BREAKING #chinnaswamystadium #Karnataka #IPL2025 https://t.co/XqJz807CY8 pic.twitter.com/ZxdCOaZso5
— Indian Observer (@ag_Journalist) June 4, 2025
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी कशी झाली?
चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आरसीबीच्या विजयी परेडमध्ये सहभागी असलेल्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.
समारंभाला कोण-कोण उपस्थित असणार :
कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील असणार आहे.





