Breaking News : महाराष्ट्रात रेड अलर्ट.! अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – हवामान खात्याने कोकण विभागाला आज अलर्ट जारी केला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच मुंबई, ठाण्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर रायगड आणि रत्नागिरीत उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट दिला आहे.
पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी…
खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. मात्र, पुरेसा पाऊस झाला नसल्यानं प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 14 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याचं दिसून येत आहे.





