Breaking News : आता लाडक्या बहिणींना मिळणार हक्काचं घर! मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले, पाहा…

Ladki Bahin Yojana। Devendra Fadnavis – आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.
आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत. दरम्यान, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून दोन हजार 100 रूपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते.
आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2 हजार 100 रुपये जमा करू असं महायुतीकडून सांगण्यात आलं होत. मात्र त्यासाठी थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
नवं सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एकाच वर्षात तब्बल वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे, याचा लाभ हा जे जे बेघर आहेत, त्या सर्वांना मिळेल. विषेत: लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबतच हक्काचं स्वत:च घर देखील मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.





