Breaking news : मंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडली; तत्काळ रुग्णालयात दाखल
Updated On:

Uday Samant – उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज अचानक प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागला.
यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतीली लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. ते लवकरच बरे होतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोसचा दौरा केला होता.





