Breaking News: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; एकामागून एक स्फोट झाल्याने सायरन वाजण्यास सुरुवात
Israel Strikes on Iran : इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.

Israel Strikes on Iran : इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. संपूर्ण इराणमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. इस्रायली हवाई दलाने ही माहिती दिली आहे. तेहरानमध्ये अनेक ठिकाणी मोठे स्फोट ऐकू येत आहेत.
दरम्यान, संवेदनशील भाग रिकामे केले जात आहेत. इस्रायलने एकाच वेळी अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने इराणवर हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणी इस्रायलने आणीबाणी देखील जाहीर केली आहे. या हल्ल्यानंतर इराणचे हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. इराणमध्ये जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात नेले जात आहे. परिस्थिती अशी आहे की लोकांना वाचवण्यासाठी रस्त्यांवर फक्त रुग्णवाहिका दिसत आहेत. Israel Strikes on Iran
ट्रम्प यांच्या सातत्याने धमक्या
विशेष म्हणजे हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इराण वर सतत हल्ल्याच्या धमक्या देत असताना घडला आहे. तेहरानमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांनंतर अनेक ठिकाणी आग पेटली असून धूराचा लोट दिसत आहे. हे हल्ले तेव्हाच झाले आहेत जेव्हा इराण आणि अमेरिकेमधील परमाणू चर्चेत कोणतीही प्रगती झाली नाही.
अमेरिका इराणला परमाणू अस्त्रे मिळू नयेत आणि युरेनियम समृद्धी बंद करावी ही इच्छा व्यक्त करत आहे. पण इराण शांतीपूर्ण उद्देशांसाठी परमाणू संपन्न देश बनू इच्छित असल्यामुळे युरेनियम समृद्धी थांबवण्यास तयार नाही. यामुळे इराणवर हल्ल्याची कारणं उत्पन्न झाली आहेत. दरम्यान, अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मध्य पूर्वेत अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. Israel Strikes on Iran
इस्रायल एअरफोर्सने इराणवर हल्ल्यानंतर सांगितले की, मागील काही मिनिटांत संपूर्ण इजरायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत आणि मोबाईल डिव्हाइसेसवर पूर्वसूचना संदेश पाठवण्यात आले आहेत की सुरक्षित भागात रहा. संरक्षण विभाग (IDF) लोकांना यांना सुरक्षित भागाजवळ राहण्याचे आवाहन करत आहे.
In the last few minutes, sirens were sounded all throughout Israel, with an advance instruction alert directly to cellular devices to stay within proximity to protected spaces.
This is a proactive alert to prepare the public for the possibility of missiles being launched toward…
— Israel Defense Forces (@IDF) February 28, 2026
इस्रायलचे सर्व प्रमुख कार्यालये बंद करण्याचे आदेश
इस्रायलने देशातील अत्यावश्यक भाग वगळता शैक्षणिक कार्यक्रम, सभा आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्बंध लागू केले आहेत. तसेच IDF ने जनता गृह मोर्चा कमानाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय इस्रायलच्या वाहतूक मंत्री मिरी रेगेव्ह यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरी उड्डाणांसाठी इस्रायली हवाई क्षेत्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. Israel Strikes on Iran
हेही वाचा:






