Breaking News : मोफत ‘Aadhar card’ अपडेट करण्याची मुदत वाढली; वाचा सविस्तर माहिती….

Aadhar card News । आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर 12 अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असतो.
दरम्यान, अश्यातच या संदर्भात मोठी बातमी समोर आली असून भारत सरकारने 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत मोफत आधार तपशील अपडेट करण्याची टाइमलाइन वाढवली होती. त्यानंतर पुन्हा डेडलाइन वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली.
आता पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी डेडलाइन वाढवण्यात आली आहे. युजर्स 14 डिसेंबरपर्यंत फ्री मध्ये हे काम करु शकतात. UIDAI ने सोशल मीडियावर ही माहिती दिली व एक्स हँडलवर पोस्ट केलीय.
आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत संपल्यानंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI द्वारा निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. हा खर्च 50 रुपये आहे. यूआयडीएआय द्वारा देण्यात येणारी आधार कार्ड अपडेट करण्याची ही फ्री सर्विस केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.
ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचा आधार 10 वर्षांपेक्षा जुना असेल आणि तो कधीही अपडेट केलेला नसेल. UIDAI अशा लोकांना त्यांची सर्व माहिती पुन्हा अपडेट करण्यास सांगत आहे. जेणेकरून सेवा अधिक चांगल्या प्रकारे प्रदान करता येईल.
आधार का आणि कुठे आवश्यक आहे?
आधार कार्डची आवश्यकता: बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, सिम कार्ड खरेदी करणे, घर खरेदी करणे इत्यादी सर्व पैशाशी संबंधित कामांसाठी आधार कार्ड आता आवश्यक कागदपत्र बनले आहे.
जर तुम्ही तुमचे आधार कार्ड वेळेवर अपडेट केले नाही तर अनेक कामे अडकू शकतात. अनेक वेळा चुकीच्या माहितीमुळे अनेकांना योजनांचा लाभ घेता येत नाही.
आधार तपशील ऑनलाइन कसा अपडेट करायचा :
– https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या आणि तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला वन-टाइम पासवर्ड (OTP) वापरून लॉग इन करा.
– त्यानंतर आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
– त्यानंतर, तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून तुम्हाला प्राप्त होणारा OTP सबमिट करावा लागेल.
– तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित तपशील दिसू लागतील.
– तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर, आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
– त्यानंतर तुम्हाला 14 नंबरचा अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल.याद्वारे तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.
ऑफलाइन कसे अपडेट करावे :
– कृपया https://shuvan.nrsc.gov.in/aadhaar/ ला भेट द्या.
– जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी, ‘केंद्राजवळ’ टॅबवर क्लिक करा.
– जवळचे आधार केंद्र पाहण्यासाठी तुमचे स्थान तपशील प्रविष्ट करा.
– ‘पिन कोडद्वारे शोधा’ टॅबवर क्लिक करा. त्या भागातील आधार केंद्र पाहण्यासाठी तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाका.





