Dino Morea : मोठी बातमी! दिनो मोरियाला पोलिसांनी घेतले ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Dino Morea : अशातच दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

Dino Morea : मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याच्या तपासात बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाचे नाव समोर आल्यानंतर त्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी करण्यात आली होती.
या प्रकरणात दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांचीही चौकशी झाली होती. तपास यंत्रणा त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आणि प्रकरणातील आरोपी केतन कदमशी असलेल्या कथित संबंधांचा तपास सुरू केला होता.
अशातच आज दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांकडून दिनो मारिया याला अटक देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिठी नदी सफाई आर्थिक घोटाळा आणि दिशा सालियान प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
प्रकरण काय?
२००५ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात साधारणपणे १३०० कोटी रुपयांहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत सुमारे ६५ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला असून, त्यावर आर्थिक गुन्हे शाखा आणि सक्तवसुली संचालनालय तपास करत आहेत.
मिठी नदीतील गाळ उपशामध्ये १३०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची चौकशी करण्यात आली होती. दोघांनीही आर्थिक गैरव्यवहारात मुख्य आरोपी असलेल्या केतन कदम याच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधल्याचा संशय तपास संस्थांना आहे.
या प्रकरणात तब्बल ६५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले आहेत. आरोपींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेला गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिनो मोरियाला ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jio Recharge: Jio ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅन! ₹123 मध्ये मिळणार 28 दिवसांची वैधता





